अकोला: भाऊबीजच्या पूर्वसंध्येला अकोला बसस्थानकात बहिणींची गर्दी
Akola, Akola | Oct 21, 2025 लक्ष्मीपूजन पार पडताच भाऊबीजसाठी भावाच्या घरी जाणाऱ्या बहिणींची अकोला बसस्थानकात प्रचंड गर्दी झाली. वेगवेगळ्या गावांकडे जाणाऱ्या बसस्थानकावर दिनांक 21 ऑक्टोबर दुपारी 5 वाजता पासूनच महिला प्रवाशांची वर्दळ सुरू झाली आहे. भावाच्या ओवाळणीसाठी व प्रेमाच्या भेटीसाठी उत्सुक असलेल्या बहिणींची धावपळ पाहायला मिळत आहे.