भंडारा शहरातील राणी लक्ष्मीबाई वार्ड येथे भंडारा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. ५ जुलै रोजी दु. १ वा. दरम्यान मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली असता आरोपी मंगेश राऊत वय ५० वर्षे रा. राणी लक्ष्मीबाई वार्ड भंडारा या मटका बहाद्दराच्या ताब्यातून आकडे लिहिलेली सट्टापट्टी, १ डॉट पेन व नगदी १ हजार १७० रुपये असा एकूण १ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा भंडारा पोलिसांनी तपासात घेतला आहे.