जालना: चार महिन्यांत ४० बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. व्ही. कड यांची माहिती; नागरिकांनी
Jalna, Jalna | May 6, 2026 जालना जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा महिला व बालविकास विभागाने पोलीस प्रशासन आणि जागरूक नागरिकांच्या मदतीने मोठी कारवाई करत गेल्या चार महिन्यांत तब्बल ४० बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. ही माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. व्ही. कड यांनी दिली. आर. व्ही. कड यांनी सांगितले की, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मुलींचे शिक्षण सुरू असतानाच त्यांचे विवाह लावले जातात. त्यामुळे मुलींचे शिक्षण अर्धवट राहतेच, शिवाय अल्पवयात विवाह झाल्याने त्यांच्या आरोग्