भोकरदन: बागेश्वर बाबा(धीरेंद्र शास्त्री)वर गुन्हा दाखल करावा मागणीसाठी पोलीस ठाणे येथे वारकरी सांप्रदायाने केले भजन आंदोलन
आज दिनांक 27 एप्रिल 2024 वार सोमवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास भोकरदन पोलीस ठाणे येथे परिसरातील व शहरातील वारकरी सांप्रदायाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित वाघेश्वर बाबा धिरेंद्र शास्त्री याच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पोलीस ठाणे येथे बसून भजन आंदोलन केले आहे, वीरेंद्र शास्त्रींनी हिंदू समाजाचा अपमान केला आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान केला आहे त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.