अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे मिळाल्याने आज एकच खळबळ उडाली. धमकीची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला. सुरक्षेच्या दृष्टीने कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. बॉम्ब शोधक पथकाद्वारे संपूर्ण इमारतीची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आल्या नाहीत.