दर्यापूर: अंबा देवी साखर कारखान्यामागे आढळले वन्य प्राण्यांचे पायाचे ठसे;शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
दहिगाव रोडवरील अंबा देवी साखर कारखान्यामागे आज सकाळी १० वाजता वन्य प्राण्यांचा वावर असल्याचे दिसून आले असून वन्य प्राण्यांचे पायाचे ठसे दिसून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर काही शेतकऱ्यांना एक वाघ व त्याचे दोन बछडे दिसून आल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून देवगाव, खोडगाव, वडाळी शेतशिवरात वाघ व बिबट्याचा वावर असल्याच्या खुणा दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.