Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: परतूरमध्ये अवैध धंद्यांचा वाढता सुळसुळाट; मातंग मुक्ती सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

Jalna, Jalna | Apr 15, 2026
जालना जिल्ह्यातील परतूर शहर व परिसरात मागील काही महिन्यांपासून अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. बुधवार दि. 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुयार सट्टा, मटका, पत्ते, तसेच लाकूडतोड यांसारखे विविध अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असून, यामुळे नवतरुण वर्ग वाममार्गाला लागून गुन्हेगारीकडे वळत असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केलंय. मातंग मुक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू गोफणे हे उपोषणाला बसलेत
जालना: परतूरमध्ये अवैध धंद्यांचा वाढता सुळसुळाट; मातंग मुक्ती सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण - Jalna News