नागपूर शहर: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरून हटविण्यात आले अतिक्रमण : शुभांगी देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक तहसील
तहसील पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी 5 जूनला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मोमीनपुरा परिसरातील रस्त्यावरून अतिक्रमण हटविण्यात आले आहे. बकरी ईद दिवशी कुर्बानी झाल्यानंतर उर्वरित कचरा नेण्यासाठी येथून मनपाच्या नागरिकांना त्रास होतो त्यामुळे रस्त्यावरून अतिक्रमण हटविण्यात आले आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी दिली आहे.