मोताळा तालुक्यात रमाई आवास योजना, मोदी आवास, शबरी आवास योजनेत अनेक लाभार्थी पात्र ठरले असुन पात्र ठरलेल्या लाभार्थींना कागद पत्र दिले आहेत. काही लाभार्थ्यांचा पहीला, दुसरा ,तिसरा हप्ता बाकी आहे दोन ते अडीच महीने झाले लाभार्थींना कुणाचा पहीला ,दुसरा, तिसरा हप्ता मिळालेला नाही म्हणुन लाभार्थ्यांचे बांधकाम रखडले आहेत. मोताळा तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान तत्काळ लाभार्थ्यांचे खात्यावर जमा करावे अशी मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने ४ डिसेंबर रोजी मोताळा गट विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.