गेवराई: गेवराईच्या एनके कॅपिटल अपार्टमेंट मध्ये भरधाव वेगात आलेला ट्रॅक्टर घुसला, अनेक दुचाकींचा चुरडा झाला
Georai, Beed | Oct 19, 2025 गेवराईत भरधाव # ट्रॅक्टर थेट अपार्टमेंटमध्ये #घुसला! एन. के. कॅपिटल अपार्टमेंटमध्ये रविवारी रात्रीच्याच्या सुमारास ट्रॅक्टर घुसल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी टळली, पण मोटारसायकल आणि दोन स्कुटींचा अक्षरशः चुराडा झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, बेफिकीर ट्रॅक्टर चालक तरुणाला जमावाने चांगलाच चोप दिला. ताकडगाव रोड हा शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे.