चोपडा: चोपडा तालुक्यातील सत्रासेने येथून घराच्या बाहेर लावलेली मोटर सायकल चोरी, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Sep 27, 2025 चोपडा तालुक्यात सत्रासेन हे गाव आहे. या गावातील रहिवासी निलेश गोकुळ जोशी यांनी आपल्या घराच्या बाहेर त्यांची मोटरसायकल क्रमांक एम.एच.१९ सि.टी.३३२८ ही लावली होती. तेव्हा तेथून कोणीतरी अज्ञात चोट्याने त्यांची मोटरसायकल चोरी केली हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.