चंद्रपूर: बिनबा गेट परिसरात
विधीसंघर्षित बालकाच्या ताब्यातून १ लाखाचा मुद्देमाल हस्तगत :स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
शहरातील बिनबा गेट परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या अल्पवयीन चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई करून पकडले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना सोन्याच्या दोन अंगठ्या मिळाल्या असून, या अंगठ्या घुटकाळा वॉर्ड येथील एका घरफोडीतील असल्याचे उघड झाले आहे.काल दि 18 ऑक्टोबर ला रात्री 9 वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहरात गस्त घालत असताना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, बिनबा गेट शांतीधाम परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या फिरत आहे.