भोकरदन: 29जुलै लाशहरात मी रमाई या एकपात्री नाट्याचे आयोजन,सिने अभिनेत्री प्रियंका उबाळे यांची भोगवर्धन बुद्ध विहारात बैठक पार
आज दिनांक पाच जुलै 2026 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील भोगवर्धन बुद्ध विहारांमध्ये प्रसिद्ध सिंह अभिनेत्री प्रियंका ओवाळी यांची बौद्ध समाज बांधवांसोबत बैठक संपन्न झाली असून या बैठकीमध्ये 29 जुलै रोजी मी रमाई या एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, या कार्यक्रमात धाडसी रमाई दाखवणार असून रमाईचा धाडसी इतिहास सर्व समाजापर्यंत पोहोचवणार आहे. या बैठकीला शहरातील व तालुक्यातील समाज बांधव उपस्थित झाले होते.