मिळालेल्या एका गुप्त माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र क्षेत्रातील नाल्यातून अवैधपणे रेतीचे उत्खनन करून रेती तस्करी करणाऱ्या एका ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई करण्यात आली. सदर कारवाई भद्रावती वनविभागा द्वारे आज दि . 26 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजता मासळ नियत क्षेत्रातील एका नाल्यात करण्यात आली. एम एच 33 f 20 38 या क्रमांकाच्या ट्रॅक्टर द्वारे वनपरिक्षेत्रातील नाल्यातून अवैध रेती तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी सदर कारवाई केली.