अलिबाग: नॅशनल एज्युकेशन डे निमित्त विधी साक्षरता कार्यक्रम संपन्न
बालविवाह मुक्त भारतासाठी जनजागृती — शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित
Alibag, Raigad | Nov 7, 2025 नॅशनल एज्युकेशन डे निमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड – अलिबाग आणि चिंतामणराव केळकर विद्यालय, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने “विधी साक्षरता आणि जनजागृती कार्यक्रम” चे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम चिंतामणराव केळकर विद्यालय, अलिबाग येथे पार पडला.अध्यक्षस्थानावर वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड सचिव तेजस्विनी निराळे या होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी “बालविवाह मुक्त भारत” या संकल्पनेवर भर देत बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे महत्त्व विशद केले.