चंद्रपूर: नियोजन भवन येथे भाजपा तर्फे कार्यकर्त्यांसह आ.जोरगेवार कडून महसूलमंत्री बावनकुळे यांचे स्वागत
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी_बावनकुळे हे आज दि 20 सप्टेंबर ला 1 वाजता चंद्रपूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान नियोजन भवन, चंद्रपूर येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीपूर्वी भारतीय जनता पार्टी, चंद्रपूरच्या वतीने कार्यकर्त्यांसह आ. किशोर जोरगेवार यांनी उत्साहपूर्ण वातावरणात महसूल मंत्री बावनकुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.