तेल्हारा शहरातील माळेगाव नाका ते पी.पी. पाटील पेट्रोल पंप रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने संतप्त नागरिकांनी आज प्रतीकात्मक खड्डा खोदून आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नागरिकांनी रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याची, तसेच तेल्हारा-अडसूळ, हिवरखेड व वस्वट मार्गांवर अपघातप्रवण ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी केली. अपुऱ्या रस्त्यामुळे झालेल्या अपघातात ऋषिकेश पिसे या युवकाला झालेल्या जखमांची जबाबदारी ठेकेदारावर टाकत नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली.