रामटेक तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत टप्पा दोन मधील विविध प्रस्तावित विकास कामांंबाबत आढावा बैठक रवी भवन येथे रविवार दिनांक बावीस फेब्रुवारीला दुपारी घेण्यात आली. या बैठकीत नियोजित कामांची सद्यस्थिती तपासून प्रगतीपथावर असलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच रामटेक गडमंदीर परिसरातील रोपवे प्रकल्पाचा विकास, संचालन व देखभाल विषयक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.