मालेगाव: मालेगावी ईद मोहररमला वेळेवर पाणी पुरवठा मग दिवाळीत का नाही - भाजप नेते देवा पाटील
मालेगावी ईद मोहररमला वेळेवर पाणी पुरवठा मग दिवाळीत का नाही - भाजप नेते देवा पाटील मालेगाव येथील भारतीय जनता पार्टी तर्फे मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांना आज दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी साडे 12 वाजेच्या सुमारास निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा विभागाच्या गलथान कारभाराचा निषेध करत एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्याची तसेच वारंवार पाईप लाईन दुरुस्तीच्या नावाने बिल काढणाऱयांची चौकशी करण्याची मागणी भाजपा मालेगाव तर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली.