आष्टी: अल्पवयीन मुलींना बळजबरीने उचलून गाडीत टाकून तिच्यावर अत्याचार केला, आष्टी पोलीस ठाणे हद्दीत घडली घटना
Ashti, Beed | Oct 1, 2025 आष्टी पोलिस ठाणे हद्दीतील एका गावातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला बळजबरीने चारचाकी वाहनातून उचलून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गंभीर प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीने मित्रांच्या मदतीने या अल्पवयीन मुलीला तिच्या गावातून जबरदस्तीने चारचाकी वाहनातून प्रथम खडकत येथे नेले. त्यानंतर तिला पनवेल येथे नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत