हदगाव: महाविकास आघाडीच्या मित्र पक्षाने हुंडा वाचवून सोयरीक मोडण्याचं काम केलं.खासदार आष्टीकर यांचा हदगाव येथे काँग्रेसवर आरोप
Hadgaon, Nanded | Nov 21, 2025 आज 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान हादगाव येथे खासदार नागेश पाटील अष्टीकर म्हणाले हदगाव मध्ये दोन शिवसेनेत लढत होतं आहे. हदगावमध्ये उबाठा गट भक्कम असून यश नक्की मिळेल असा विश्वास खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केलाय. वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे केले आहे. आघाडी साठी आम्ही सकारात्मक होतो, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हुंडा वाचवून सोयरीक मोडण्याचे काम केल्याचा आरोप खासदार आष्टीकर यांनी केलाय..