नागपूर ग्रामीण: 'स्व-गणना' करून राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हा; नितीन गडकरी व महापौर निता ठाकरे यांचे आवाहन
देशातील १६ व्या राष्ट्रीय जनगणनेला आजपासून नागपूर शहरात उत्साहात सुरुवात झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महापौर निता ठाकरे यांनी स्वतःची 'डिजिटल गणना' करून या प्रक्रियेत सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी नागपूरकर नागरिकांनाही पुढे येऊन स्व-गणना करण्याचे आवाहन केले. १ मे ते १५ मे या काळात नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने स्वतःची माहिती नोंदवता येईल.