रोहा: भाले ते जावटे या रस्त्यावर रोहा आगाराची एस.टी.बस पल्टी ४ विद्यार्थी व ४ प्रवासी किरकोळ जखमी
Roha, Raigad | Sep 15, 2025 राज्य परिवहन महामंडळ रोहा आगारातील रोहा- कोलाड - भाले ही एम.एच 20 बी.एल. 3866 एस.टी.बस सोमवार १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता भाले ते जावटे या रस्त्यावरून प्रवास करत असताना समोरून येत असणाऱ्या वाहनाने निष्काळजीपणाने व बेदारक समोरून हुलकावणी दिल्यामुळे सदर बस ही रस्ता सोडून बाजूला असणाऱ्या खड्ड्यात कोसळली.या एस.टी. बसमध्ये पहुर गावातील चार विद्यार्थी भाले येथील हायस्कूल मध्येशिक्षणासाठी जात होते. त्यामध्ये एक शिक्षक इतर तीन प्रवासी असे एकूण आठ प्रवासी होते.