अकोला: जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयातून सायकल रॅलीचा शुभारंभ; जिल्हाधिकारी मीना यांच्याकडून हिरवी झेंडी
Akola, Akola | Nov 30, 2025 अकोला : जागतिक एड्स दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभाग, आयएमए आणि एड्स नियंत्रण संस्थामार्फत ३० नोव्हेंबर रोजी सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी हिरवी झेंडी दाखवत ८ किमी रॅलीत सहभाग घेतला. विद्यार्थी, युवक, डॉक्टरांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. एड्स जनजागृतीची शपथ देऊन रॅलीची सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरत ही रॅली जिल्हा सामान्य रुग्णालय येथे समारोपास आली.अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने सायंक