औंढा नागनाथ: देववाडी पानदरा येथील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ओढ्याच्या पुरातून रस्ता पार करत गाठावी लागते कंजारा येथील शाळा
औंढा नागनाथ तालुक्यातील पूर गावालगत असलेल्या देववाडी पानदरा येथील पहिली ते सातवी पर्यंतचे अनेक विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कंजारा येथे शाळेत असून दररोज येजा करतात परंतु या विद्यार्थ्यांना मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे दररोज ओढ्यांना पूर येत असलेल्या तीन ते चार ओढ्याच्या पुरातून जीव मोठीत धरून रस्ता पार करत शाळा गाठावी लागत आहे त्यामुळे देववाडी पानदरा ते कंजारा रस्ता करून देण्याची मागणी दिनांक 14 सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी चार वाजे दरम्यान ग्रामस्थांनी केली