जिल्ह्यातील आणखी एका ऊसतोड मुकादमचा कारखान्याच्या जाचास कंटाळून आत्महत्या करण्याच्या इशाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
कारखान्याच्या जाचास कंटाळून ऊसतोड मुकादमचा आत्महत्येच्या इशाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बीड तालुक्यातील खंडाळा येथील ऊसतोड मुकादम सुभाष चौरे ज्यांना दोन कारखान्यांनी त्यांची वाहने जप्त केली आहेत मात्र वाहनावरच उपजीविका भागवत होती वाहने दिली तर तुमची रक्कम फेडता येईल यासाठी वाहने द्यावे अन्यथा जीवाचं बरं वाईट करून घेईल व आत्महत्याही करेल असा इशारा ऊसतोड मुकादम चौरे यांनी व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे.