अकोट: शहराचे ग्रामदैवत संत नरसिंग महाराज यात्रेस गोपाल काला व दहीहंडीने प्रारंभ;विविध दिंड्यांचे आगमन
Akot, Akola | Nov 10, 2025 गोपालकाला दहीहंडी व संत नरसिंग महाराज यात्रेस प्रारंभ झाला.नरसिंग महाराज पालखीच्या नगर परिक्रमेसाठी ग्रामीण भागासह शहरातील विविध भागातून दिंड्यांचे आगमन झाले या सर्व दिंड्या नरसिंग महाराज मंदिर प्रांगण येथे संध्याकाळी पोहोचतात या ठिकाणी गोपालकाला व दहीहंडी पार पडली. यानंतर शहराचे ग्रामदैवत नर्सिंग महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी शहरवासांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली होती यामुळे सर्वत्र लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या तर अनेक ठिकाणी यावेळी भव्य महाप्रसाद पार पडला