जालना: मान्सूनपूर्व तयारीसाठी मोती तलाव येथे आपदा मित्रांना आपत्ती व्यवस्थापन व पूर बचाव प्रशिक्षण; पथकाला साहित्याचे वाटप
Jalna, Jalna | May 29, 2026 आपत्तीच्या काळात वापरण्यात येणार्या विविध बचाव साहित्याची माहिती, त्यांचा वापर, सुरक्षितता उपाययोजना तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले असून आपदा मित्र स्वयंसेवक पथकाला बचावासाठी लागणार्या साहित्याचे वाटपही करण्यात आले. शुक्रवार दि. 29 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रशिक्षणामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 26 ‘आपदा मित्र’ स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. यावेळी जल बचाव व पूर परिस्थितीत वापरण्याचे प्रशिक्षण दिले.