चंद्रपूर: आप'चे रस्त्याच्या दुरवस्थेबाबत जिल्ह्यातील विसापूर टोल प्लाझा कंपनीला निवेदन
जिल्ह्यातील बामणी-बल्लारपूर-चंद्रपूर-भद्रावती-वरोरा महामार्ग खड्डेमय व धोकादायक झाला असल्याने टोल कंपनी व प्रशासनाकडून निष्क्रियता, व जनतेच्या जीवाशी खेळ सुरु आहे. येत्या ५ दिवसांत रस्ता दुरुस्त न केल्यास विसापूर टोल प्लाझा १००% बंद करण्याचा इशारा आप च्या बल्लारपूर टीमने विसापूर टोल कंपनीला आज दि १५ सप्टेंबर १२ वाजता निवेदनातुन दिला आहे. यावेळी आम आदमी पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.