जळगाव: खेडी कढोली येथे धक्काबुक्कीवरून दोन गटात तुफान हाणामारी; १३ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, सिविलमध्ये दाखल
एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली येथे देवीच्या विसर्जन मिरवणुकीत धक्काबुक्की लागण्यावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. यामध्ये दोन्ही गटातील एकूण १३ जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या सर्वांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी दोन्ही गट पुन्हा रुग्णालयात समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले