दिंडोरी: पिंपळगाव दिंडोरी रस्त्यावर चिंचखेड शिवारामध्ये टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक पलटी जीवितहानी नाही मालाचे व गाडीचे नुकसान
दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड शिवारामध्ये टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे .सदर ट्रक हा पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथून टोमॅटो घेऊन दिंडोरी कडे जात असताना रस्त्याच्या साईट पट्ट्या न भरल्याने व खड्ड्याच्या साम्राज्य असल्याने ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे .या अपघातात जीवित हानी जरी झाली नसती तरी टोमॅटो व गाडीचे नुकसान झाले आहे .