धामणगाव रेल्वे: शिवाजी वार्ड येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पतसंचलन; नागरिकांनी पुष्पवर्षाव करून केले स्वागत
धामणगाव रेल्वे विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पारंपरिक पतसंचलन आज मोठ्या शिस्तीत व दिमाखदार वातावरणात पार पडला. शहरातील शिवाजी वार्ड येथून पतसंचलनाला प्रारंभ झाला.शिस्तबद्ध पद्धतीने पांढऱ्या शर्ट–खाकी पॅंट व भगव्या पताकांसह स्वयंसेवक एकसुरी पावलांनी मार्गक्रमण करीत होते. पतसंचलनाने शहरातील प्रमुख चौकांमधून फेरफटका मारला. नागरिकांनीही स्वयंसेवकांवर पुष्पवर्षाव करून स्वागत केले.या प्रसंगी स्वयंसेवकांनी देशभक्तीपर घोषवाक्ये देत वातावरण राष्ट्रभक्तीने भारून टाकले.