जालना: तीर्थपुरीत चार जिवंत काडतूस, गावठी पिस्टलसह आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Jalna, Jalna | Apr 30, 2026 जालना जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणार्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तीर्थपुरी येथील एका आरोपीला अटक केली आहे. गुरुवार दि. 30 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीर्थपुरी (ता. घनसावंगी) येथे सापळा रचला. यावेळी शंकर विक्रम ताटे (वय 32 वर्ष) याला ताब्यात घेतले.