चोपडा: नागलवाडी येथील वरडा फाट्याजवळ गोवंश वाहतूक करणारे वाहन पकडले,चोपडा शहर पोलिसात दोन जणाविरुद्ध गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Sep 15, 2025 चोपडा तालुक्यात नागलवाडी हे गाव आहे. या गावात वरडा फाटा आहे. या फाट्याजवळ वाहन क्रमांक एम. एच.०३ सी. व्ही.०३२९ याद्वारे मुकेश धनगर व गोलू उर्फ तुळशीदास पाटील हे दोन गोवंश वाहतूक करून येत होते. याची माहिती चोपडा पोलिसांना मिळाली पथक त्या ठिकाणी गेले त्यांनी वाहन गोवंश असा एकूण तीन लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.