जालना: शहरातील तहसील कार्यालय येथे असलेल्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांनी लावली उपस्थिती
Jalna, Jalna | Jun 18, 2026 आज दिनांक 18 जून 2026 वार गुरुवार रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास जालना शहरातील तहसील कार्यालय येथे असलेल्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदार राजांनी उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळाले आहे ,छत्रपती संभाजी नगर जालना विधान परिषद निवडणूक प्रक्रिया आज पार पडत असून यामध्ये जालन्याच्या एकूण 90 मतदार हे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे, आणि हे मतदार आता आपले मोलाचे मत कोणाच्या बाजूने देणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.