माणगाव तालुका, निजामपूर विभागातील ग्रामपंचायत करंबेळी हद्दीत कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या वाकी ते हरवंडी जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण आज शुक्रवार दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास सुमारास कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. सदर पुलाचे काम (मे आर्या इंटर प्रायझेस ) या सबंधित ठेकेदार कंपनीने शंभर दिवसात पूर्ण केल्या बद्दल त्यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले. या लोकार्पण सोहळ्याला तालुक्यातील तसेच निजामपूर विभागातील शिवसेना आणि युवासेना पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. स्थानिक नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि सोयीची सुविधा ठरणार आहे.