जिल्ह्यात पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने जिल्हाधिकारी जॉन्सन यांचे मंगळवारी सर्व शाळांना सुट्टी देण्याचे आदेश
Beed, Beed | Sep 16, 2025 जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे अनेक नद्या नाल्यांना महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा जोर कायम राहणार असल्याने बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व खाजगी आणि सरकारी शाळा अंगणवाडी आश्रम शाळा महाविद्यालय यांना मंगळवारी सुट्टी जाहीर करत सतर्कतेचा इशारा दिला आहे.