बार्शीटाकळी: भिकुंड नदीत सापडला मृतदेह, पिंजरच्या संत गाडगे महाराज आपत्कालीन शोध बचाव पथकाचे सर्च ऑपरेशन यशस्वी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे हायवेवरील पुलावरून एका व्यक्तीने भिकुंड नदीत उडी घेतल्याची घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने रात्री सर्च ऑपरेशन सुरू केले. पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने शोध मोहिम थांबवावी लागली. मात्र रविवारी सकाळी दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रेस्क्यू बोट ने मृतदेह शोधून काढला