केळापूर: करंजी येथे भिक्षा मागण्यावरून वाद, किन्नर महिलेला मारहाण करून भर दिवसा दोन तोळ्याची पोत लंपास
भिक्षा मागण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून किन्नर महिलेला मारहाण करून तिच्या गळ्यातील अंदाजे दोन तोळे सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातील करंजी येथे दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळच्या दरम्यान घडली याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी फरार आहे.