आज दिनांक 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 5च्या दरम्यान बिलोली येथे गोदावरी परिक्रमा यात्रेचे बिलोली मध्ये भव्य स्वागत करण्यात आले. गोदावरी परिक्रमा यात्रेत वृंदावन, चित्रकुट, ओंकारेश्वर, उज्जैन, द्वारका, जगन्नाथपुरी आदी ठिकाणच्या साधु,संत ,महंत सहभागी झाले आज या यात्रेचे आगमन झाले. या निमित्ताने बजरंग दलाच्या वतीने भव्य अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. तर शहरातील जुने बस स्थानक चौकात पुष्प वृष्टी करून साधु संतांचे स्वागत करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.