मुरुड: रेवदंडा -मुरुड रस्त्यावर विहूर गावा नजिक विहूर नजीक एसटी- पिकअपचा अपघा13 प्रवासी जखमी
Murud, Raigad | Sep 27, 2025 रेवदंडा -मुरुड रस्त्यावर विहूर गावा नजीक आज शनिवार दि. 27 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि पिकअप यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये पिकअपमधील 13 प्रवासी जखमी झाले आहेत. अलिबाग येथून एसटी बस मुरुड कडे येत असताना पिकअप टेम्पो हा अलिबागच्या दिशेने जात होता. दरम्यान विहूर येथील वाकड्या आंब्याजवळील एका अवघघड वळणार गाडीचा ताबा सुटल्याने सदरील पिकअप टेम्पोने एसटीला जोरदार धडक दिली त्यामुळे टेम्पो व एसटीचे मोठे नुकसान झाले आहेत.