एका खाजगी कंपनीत कामावर असताना लोखंडी प्लेट लागून गंभीर जखमी झालेल्या ४५ वर्षीय कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना 'टू फॉर्म टेक्नो प्रायव्हेट लिमिटेड' कंपनी, कवठा येथे घडली.मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद नथ्थुजी बोराडे हे नेहमीप्रमाणे कंपनीत कामावर गेले होते. १२ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास काम करत असताना त्यांच्या पोटाला लोखंडी प्लेट लागल्याने ते गंभीर जखमी झाले.घटनेनंतर त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी टेकाडी येथे नेण्यात आले.