धर्माबाद: नगर पालिका निवडणुकीत मराठवाडा जनहित पार्टीचा दनदणीत विजय,नगराध्यक्ष पदासह 15 नगरसेवक विजयी
आज दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता शहरातील न्यायालय येथे धर्माबाद नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने मत मोजणीला सुरुवात झाली त्या नंतर एक एक करत प्रत्येक प्रभागाचे निकाल हाती आले होते यात सर्वात मोठी पक्ष म्हणून मराठवाडा जनहित पार्टी समोर आली असून त्यांचे 15 नगर सेवक व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून आले होते, तर भाजपचे 7 नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आले होते यात राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष दोन्ही शिवसेपक्षाचे खाते देखील उघडले नसल्याने त्यांची पाटी कोरीचा राहिली आहे.