जालना: रेल्वे स्टेशन परिसरातून मोटारसायकल चोरी; दहा मिनिटांत अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास
Jalna, Jalna | May 6, 2026 जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून अवघ्या दहा मिनिटांत मोटारसायकल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवार दि. 6 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिजवान खान अकबर खान पठाण रा. जळगाव सोमनाथ, ता. जि. जालना यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ते मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मालकीची एचएफ डिलक्स कंपनीची हेवी ग्रे रंगाची मोटारसायकल क्रमांक एमएच 21 बीई 6579 चोरी गेली.