गोंदिया: विष प्राशनामुळे शेतकऱ्याचा मृत्यू, देवूटोला येथील घटना
Gondiya, Gondia | Oct 17, 2025 दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम देवूटोला येथील कीर्तीकुमार श्रादन पटले (४२) या शेतकऱ्याचा विष प्राशनामुळे मृत्यू झाला. ही घटना ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:१५ वाजता घडली. त्याच्या मृत्यूमागील कारण कळू शकले नाही. या घटनेची नोंद दवनीवाडा पोलिसांनी गुरुवारी (दि.१६) घेतली आहे. तपास पोलिस निरीक्षक वैशाली ढाले यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी गुलाबदास तुरकर करीत आहेत.