सेनगाव: आजेगाव येथील 100 वर्षीय वृद्ध महिला कोंडाबाई भालेराव यांनी घेतला जगाचा निरोप,परिसरात हळहळ व्यक्त
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील रहिवासी असलेल्या 100 वर्षीय वृद्ध महिला कोंडाबाई काशिनाथ भालेराव यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने गावावर एकच शोककळा पसरली आहे. त्या ज्येष्ठ पत्रकार केशव भालेराव यांच्या आजी होत्या. तर भावपूर्ण वातावरणामध्ये आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता त्यांच्यावर आजेगाव या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आज काल जवळपास 70 ते 80 या वयोगटांमध्ये माणसांना देवाज्ञा होण्याचे प्रमाण वाढले आहे मात्र कोंडाबाई भालेराव यांनी चक्क 100 वर्ष जीवन जगले.