सोशल मीडियावर हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण अरविंद हातागडे (१९, रा. विश्वास नगर) असे आरोपीचे नाव आहे.२८ डिसेंबर रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये प्रवीण हातात तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसत होता. पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेऊन तत्काळ तपास चक्रे फिरवली. विश्वास नगर भागात शोध घेऊन त्याच्या घराची झडती घेतली असता, पोलिसांना एक धारदार लोखंडी तलवार मिळाली