अंजनगाव सुर्जी: हंतोडा फाट्याजवळ हरिण आडवे गेल्याने दुचाकीचा अपघात;२ गंभीर जखमी
अंजनगाव-दर्यापूर रोडवरील हंतोडा फाट्याजवळ आज दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६:३० वाजता हरिण आडवे गेल्याने दुचाकीचा गंभीर अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले.अपघातग्रस्त हे चांदूरबाजार एस.टी. महामंडळातील कर्मचारी असून,अंजनगावहून वनोजा गावाकडे जात असताना हंतोडा फाट्याजवळ अचानक रस्त्यावर हरिण आल्याने दुचाकीचा अपघात घडला.या घटनेत एस टी महामंडळ कर्मचारी उद्धवराव मानकर वय ५८ वर्ष हा कर्तव्य बजावून त्यांच्या गावाकडे वनोजा येथे जात होते.