शासनाकडून पाणीपुरवठा योजनांची देयके दीर्घकाळ रखडल्यामुळे कंत्राटदारांवर गंभीर आर्थिक संकट ओढावले आहे. या आर्थिक विवंचनेतून नागपूर व सांगली येथील दोन पाणीपुरवठा कंत्राटदारांनी आत्महत्या केली, तर वर्ध्यातील एका कंत्राटदाराचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.आज दुपारी एक वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील पाणीपुरवठा कंत्राटदारांच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर मृत कंत्राटदारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.