जालना: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी हेक्टरी 10 हजार रुपये अनुदानाची मागणी; धर्मवीर छावा संघटनेचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
Jalna, Jalna | Jun 8, 2026 खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्यातील सर्व पात्र शेतकर्यांना हेक्टरी 10 हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी धर्मवीर छावा संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करून शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करीत असून बियाणे, खते, कीटकनाशके यासाठी परेशान आहेत.